Category सिंधुदुर्ग

शिरोडा भाजप युवा मोर्चातर्फे ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

शिरोडा : भारतीय जनता पार्टी शिरोडा युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ अंतर्गत नेत्रतपासणी केलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) शिरोडा येथील भाजप कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!पालकमंत्री नितेश राणे

रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी “ ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे,” अशा भावनिक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यातमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा!१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार

महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्वेर ना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करणार. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचे…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यशाची वाटचाल करावी – पद्मश्री परशुराम गंगावणे

सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व…

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा! पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी, दि. १ (जिमाका) : जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश

रस्ते, शिवसृष्टी आणि देवगड नळपाणी योजनांचा पालकमंत्र्यांकडून सखोल आढावा *सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची बारकाईने नजर *पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

🌊 ओवी रिसॉर्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!ओवी रिसॉर्ट, देवबाग – तारकर्ली, मालवण जिल्हा सिंधुदूर्ग

🌊 ओवी रिसॉर्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 🌴 ओवी रिसॉर्ट, देवबाग – तारकर्ली, मालवण जिल्हा सिंधुदूर्ग पर्यटन क्षेत्रातील नामांकित ओवी रिसॉर्ट आपल्या टीममध्ये उत्साही, प्रामाणिक आणि मेहनती सहकाऱ्यांचे स्वागत करत आहे. 📢 रिक्त पदे 🏨 रिसॉर्ट मॅनेजर – १ जागा🛎️ रूम सर्व्हिस…

“साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा; माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी” – पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; जिल्ह्यात साहित्यिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार सावंतवाडी प्रतिनिधी :“कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्वरूपात राबवा. माझे आशीर्वाद सदैव…

सावंतवाडीतील अंगणवाडी क्र. १५ मध्ये चिमुकल्यांनी आईची पाद्यपूजा अन् औक्षण करून साजरी केली गुरुपौर्णिमा!

सावंतवाडी प्रतिनिधी:गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुला वंदन करण्याची आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. आपल्या जीवनात ‘पहिली गुरू’ म्हणून नेहमीच आईचा सर्वोच्च सन्मान केला जातो. याच संस्कारांची शिदोरी बालवयातच चिमुकल्यांच्या मनात रुजवण्यासाठी सावंतवाडी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ मध्ये एका अत्यंत भावूक…