Mahasindhu

Mahasindhu

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील उद्यानात वैश्विक शांततेसाठी विश्व प्रार्थना सभेचे आयोजन-युद्धात जीव गमावलेल्या निरपराधांना वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी : आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. अवघे विश्व आज विज्ञानमय झाले आहे.  आपले जीवन विज्ञानाने सुखी केले असले तरी मात्र विज्ञानाने अणुबॉम्बसारख्या काही विनाशक गोष्टीही तयार केल्या आहेत. आज इराण – इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात ज्या…

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न मळगाव हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने मळगाव तेलीवाडी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च २०२६…

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे मळगाव धाकोरे शाळा नंबर १ येथे खास शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना आपल्या ऐतिहासिक शिवकालीन साधनांची (शस्त्रांची ) माहिती व ती शस्त्र प्रत्यक्षरीत्या हाताळण्याची संधी धाकोरे शाळा नंबर १…

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन तळवडे:तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी वसंत उर्फ प्रशांत गुंडू पडते यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी गुंडू पडते यांचे आज गुरुवारी सकाळी ७ वाजता…

आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व! जगाचा उद्धार करणारी माता आहे. स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे विक्रांत सावंत जिल्हा परिषद

सावंतवाडी : आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराला घरपण देणारी आई, आजी, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिका निभावणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करणारी माता आहे. स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान झालाचं पाहिजे. आपल्या…

कृषी विभागाच्या विविध योजना व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवा -सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत-सावंतवाडी येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन सावंतवाडी महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्यामार्फत मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी कृषी महोत्सव कार्यक्रम राणी पार्वती…

शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न सावंतवाडी : तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव २०२५–२६ मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाला…

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी!पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती-सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी*पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती*सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार,

मळगाव येथे १८ मार्च रोजी ‘द केरला स्टोरी २’ चित्रपट

मळगाव येथे १८ मार्च रोजी ‘द केरला स्टोरी २’ चित्रपट धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिवशंभू ग्रुपच्यावतीने आयोजन सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून श्री शिवशंभू ग्रुप, मळगावच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १७ मार्चला महत्त्वाची बैठक

कोकणातील आंबा-काजू नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १७ मार्चला महत्त्वाची बैठक कणकवली : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार, १७ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजता मंत्रीमंडळ सभागृह, विधान भवन,…