Category कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य दारू,ड्रग व अनैतिक धंदे मुक्त होण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडक भूमिका घ्यावी! ; पालकमंत्री ना. नितेश राणे

पोलीस निवस्थाने व वाहन व्यवस्थेला प्राधान्य देणार.!. सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार दहा अद्ययावत स्टीलच्या स्पीड बोटी आणणार.! सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत याची काळजी घ्या.हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आपली ताकद वापरावी. बेकायदा दारु, मटका…

भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – संविधान गौरव अभियान , सिंधुदुर्ग .

संविधान गौरव अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे राबवीण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा बैठक संपन्न सिंधुदूर्ग भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची जिल्हास्तरीय बैठक वसंत स्मृती – सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा उपाध्यक्ष तथा संविधान गौरव अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे!राजकीय,प्रशासन आणि पत्रकार यांच्यात संवादाची भूमिका हवी

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्गनगरी येथे झाला पत्रकार दीन साजरा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रामचंद्र कुडाळकर जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे. अन्यथा…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षहरिश्चंद्र पवार यांच्या सह,रमेश जोगळे, वैभव साळकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, काशीराम गायकवाड व मारुती कांबळे यांना जाहीर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक ज्येष्ठ व आठ आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड यावेळी करण्यात आले. पत्रकार दिनाच्या ६ जानेवारीच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या…

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस यांनी केले स्वागत

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकरणी मीटिंग संपन्न झाली. यावेळी कोकणचे सुपुत्र आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस सिंधुदुर्ग यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात करण्यात आला साजरा

सावंतवाडी:सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील माणगाव तसेच सावंतवाडी तालुक्यातील दत्तमंदिर मध्ये दत्तजयती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मंदिर परिसर दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा… अशा नामघोषात दुमदुमून गेला होता. सावंतवाडी शहरातून…

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार!कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.पराभव…

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर ,खजिनदारपदी संतोष सावंत व महेश सरनाईक (एक एक वर्ष)यांची निवड सिंधुनगरी प्रतिनिधी:  सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी. सिंधुदूर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत तब्बल ६२ टक्के इतके मतदान

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के इतके मतदान झाले. यात मतदारसंघ नुसार टक्केवारी कणकवली ६०.०३ कुडाळ ६४ तर सावंतवाडी मध्ये ६२ टक्के इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालया कडून मिळाली आहे.