Category महाराष्ट्र

वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार

वेंगुर्ला श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या मंगलकलशाची यात्रा वेंगुर्लेत काढण्यात येणार आहे .वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आवश्यक पाणी तिलारी योजनेतून देणार,टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याची पत्रकार परिषदेत माहिती!

केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली माहिती. कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव देणारं सावंतवाडी सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी या टर्मिनसचे…

ओटवणे गावातील वैद्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळाचे आयोजन.. सावंतवाडी,दि.२७: वनऔषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य गावाचे आरोग्य दूत तसेच गावाचे भूषण आहे. त्यांच्या या निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन गावठणवाडी कला क्रीडा मंडळाने त्यांचा केलेला सन्मान आदर्शवत असुन कौतुकाची ही थाप…

मळगाव-आजगावकरवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा

सावंतवाडी मळगाव- आजगावकरवाडी येथील भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री देव दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दत्त जयंतीनिमित्त येथील मार्गांवर विविध प्रकारची रांगोळी रेखाटण्यात आली होती. या सोहळ्यानिमित्त मंगळवार सकाळपासून…

विहिरीत पडलेल्या सहा महिन्याच्या गवा रेड्या च्या पिल्लाचे प्राण होडावडे येतील अजित नाईक यां तरुणाने वाचविले

स्वतःचे धाडस दाखवून लहान , 6 महिन्याच्या गवा रेड्याच्या पिल्लाला दिले जीवदान वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात गवा रेड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल सायंकाळी होडावडे गावातील प्रसाद मराठे यांच्या काजू बागेत असणाऱ्या विहिरीत एक सहा महिन्याचां लहान गवा रेडा…

नागपूर नगरीत होणार महाराष्ट्राचा 57वा निरंकारी संत समागमहर्षोल्हासपूर्ण वातावरणात स्वेच्छा सेवांचा शुभारंभ

समागमाद्वारे प्रसारित होणार विश्वबंधुत्वाचा उदात्त संदेश ​सिंधुदुर्ग निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26, 27 व 28 जानेवारी, 2024 दरम्यान एमएडीसी मिहान यांच्या सेक्टर 12A, 14…

भाजपा च्या वतीने ” सुशासन ” दिनानिमित्त प्रशासनातील निवृत्त अधिकाऱ्यांचा करण्यात आला सन्मान

सावंतवाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ” सुशासन दिवस ” साजरा केला जातो . भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देऊन आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे…

मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर.!

ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या हस्ते १३ जानेवारी रोजी गिरगाव साहित्य संघात मातोंडकर यांचा गौरव. ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य- सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कवी मधुकर मातोंडकर…

त्यांच्या 35 वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

श्री जनता विद्यालयातील दहावीच्या 1987 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयातील १९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तळवडे जनता विद्यालयात पार पडले .यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी जवळपास गेल्या 35 वर्षानंतर हे माजी विद्यार्थी…

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी अजित राऊळ यांची नियुक्ती

सावंतवाडी साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित राऊळ हे मुंबई…