Month October 2026

तळवडे विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून कौतुक!

PACS एक्सेलेशन कार्यक्रम अंतर्गत निवड; भविष्यातील व्यावसायिक प्रगतीसाठी मोलाचे मार्गदर्शन सावंतवाडी : तळवडे विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नाबार्डचे सीजीएम डॉ. भवानी शंकर आणि डीजीएम श्रीमती दिपाली माळी यांनी नुकतीच संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेच्या कामकाजाचे त्यांनी विशेष कौतुक…

तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा! नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक…

सावंतवाडीतील जिमखाना मैदान राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा विशेष पुढाकार; MCA चे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांच्याकडून मैदानाची पाहणी!

रणजी, राज्य आणि राष्ट्रीय सामन्यांसाठी सावंतवाडी जिमखाना मैदानाची MCA सोबत टाय-अप (Tie-up) करण्याची योजना! सावंतवाडी (प्रतिनिधी) :सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक व प्रमुख क्रीडाकेंद्र असलेल्या जिमखाना मैदानाची विविध स्पर्धांसाठी दर्जेदार उभारणी करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि…

प्रामाणिकपणाचा अनमोल दागिना! मुबई पोलिस शिपाई अनिल पाटील यांनी जपला खाकी वर्दीचा मान

मुंबई : कर्तव्याच्या वाटेवर प्रामाणिकपणाची मशाल हाती घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित मालकाला परत मिळवून देण्यात महत्त्वाची…

सावंतवाडी तालुक्यात वन्यप्राण्यांचा शेतीला फटका; नुकसानभरपाई देण्याची नगरसेवक देवेंद्र टेमकर यांची मागणी! माजी आमदार तथा उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माठेवाडा, शिरशिंगे रोड परिसरासह अनेक भागांत वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या न प्रमाणात नुकसान होत आहे. रानडुक्कर, गवे, सांबर आणि बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, शेती करणे कठीण बनले आहे. या समस्येकडे वनविभागाने गांभीर्याने…

सिंधुदुर्गात अवैध मासेमारीवर कठोर कारवाई; मत्स्यव्यवसाय विभागाकडून २४८ नौकांवर २ कोटी २५ लाखांहून अधिक दंड वसूली

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत २४८ नौकांवर कारवाई करून २…

🏆 ‘मोस्ट व्हायरल गणराया’ स्पर्धेत सौरभ पोपकर प्रथम; सावंत व बाईत परिवाराने पटकावले अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक!

महासिंधु किरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग : महासिंधु किरण न्यूज चॅनेल आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोस्ट व्हायरल…

जबाबदार लोकप्रतिनिधी हेच ग्रामविकासाचे आधारस्तंभ : सभापती शंकर घारे

तुळस येथे ‘वीलीड’ उपक्रमांतर्गत पुरुषांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम; महिला नेतृत्वाला सहकार्याचे आवाहन ग्रामंचायत सदस्य आणि सहकारी सोसायटी च्या पदाधिकारी , शेतकरी यांचा विशेष सन्मान कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास…

सावंतवाडी नळपाणी योजना: ‘ऑडिटर अनुपस्थित मग प्रश्न कोणाला विचारणार?’ — उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा सवाल; विशेष सभा पुन्हा घेण्याची मागणी

सावंतवाडी | प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेत ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’बाबत पार पडलेली विशेष सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांत्रिक लेखापरीक्षण (टेक्निकल ऑडिट) करणारे ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथील मुख्य अन्वेषक तथा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी…

सार्वजनिक नवरात्री मंडळ धाकोरा येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा!

धाकोरा : प्रतिनिधी धाकोरा येथील सार्वजनिक नवरात्री मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या पूजनासह विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. नवरात्रोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावली.…